Monday, August 11, 2008

पूर्वरंग .. पु लं

पूर्वरंग हे पुलं यांचे प्रवास वर्णन आहे. पुलं यांनी त्यांच्या पूर्व अशियातील प्रवासाचे अनुभव या पुस्तकातून व्यक्त केले आहेत. हे पुस्तक वाचताना पुलंची निरिक्षण शक्ती किती अफाट होती याचा अनुभव येतो. ठिकठिकाणी त्यांना भेटणारी मंडळी, त्यांची पुलंशी असलेली ओळख वाचली की वाटते, इतक्या लोकांशी इतके चांगले संबंध कसे ठेवता येतात. पुलंची प्रसंग वर्णने मनाला खुप भावुन जातात.
शेवटच्या भागात मला जरा कंटाळा आला होता, पण सर्वार्थाने हे पुस्तक कमीत कमी एकदा तरी वाचण्यासारखे आहे. हे पुस्तक वाचुन मलाही वारंवार कुठे ना कुठेतरी सतत फिरत रहावं असंच वाटले.